बॅनर लावण्याच्या वादातून गोळीबार; दोन गटांत तुफान राडा, एक जखमी
Banner hoisting controversy : रामनगर येथे दोन गटात तुफान राडा झाला. रात्री बॅनर लावण्याच्या वादातून ही हाणामारी झाली. बॅनर लावण्याच्या वादातून दोन गटांत ही जोरदार हाणामारी झाली.
जालना : Banner hoisting controversy : रामनगर येथे दोन गटात तुफान राडा झाला. रात्री बॅनर लावण्याच्या वादातून ही हाणामारी झाली. बॅनर लावण्याच्या वादातून दोन गटांत ही जोरदार हाणामारी झाली. त्याचवेळी यावेळी गोळीबार केला गेला. (Firing in Jalna) या गोळीबारात एक जखमी झाला आहे. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.(Banner hoisting controversy and Firing in Jalna ; Fighting in two groups)
रामनगर येथे एका गटातून करण्यात गोळीबारात दुसऱ्या गटातील तरुण जखमी झाला. या गोळीबारात विजय ढेगळे हा 22 वर्षीय तरुण पोटात गोळी लागल्याने जखमी झाला. या जखमी तरूणाला उपचारासाठी औरंगाबाद येथे हलवले आहे.
या हाणामारीत एका गटाने दुसऱ्या गटातील तरुणावर गोळीबार केला. पोटावर गोळीबार झाल्याने विजय ढेगळे हा तरुण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी औरंगाबाद येथे हलवण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनास्थळी तणावपूर्ण शांतता आहे.
रामनगरमधील शिवसेनेचे कार्यकर्ते शिवाजी शेजुळ आणि रमेश जोशी यांच्यात रात्री रस्त्यावर बॅनर लावण्याचा कारणावरून वाद झाल्याची घटना घडली होती. या वादाचं रूपांतर सकाळी मोठ्या हाणामारीत झाले आणि दोन्ही गट आमने सामने आल्याने दोन गटात राडा झाला. या वादात रमेश जोशी यांनी शेजुळ गटाच्या तरुणावर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली, अशी माहिती पोलिसांनी दिली.