बारामतीत राडा, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पडाळकर समर्थकांना पिटाळले
बारामती विधानसभा मतदारसंघात यंदा संघर्ष होणार याची चुणूक आज पाहायला मिळाली.
पुणे : बारामती विधानसभा मतदारसंघात यंदा संघर्ष होणार याची चुणूक आज पाहायला मिळाली. भाजपकडून गोपीचंद पडाळकर येथून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांची टक्कर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशी आहे. मात्र, पाडाळकर यांच्यासाठी ही निवडणूक तशी जड जाणार आहे. तर अजित पवार यांची खरी कसोटी लागणार आहे. आज या मतदार संघात राडा पाहायला मिळाला.
भिगवण चौकात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राडा केला. गोपीचंद पडाळकर समर्थक भाजप कार्यकर्त्यांना त्यांनी पळवून लावले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या राड्यामुळे गोपीचंद पडाळकर यांची आजही रॅली रद्द करण्यात आली. दरम्यान, पडळकर यांनी बारामतीतली गुंडगिरी मोडून काढणार असल्याचा पण केला आहे.