बारामती : असं म्हणतात की गुन्हेगार गुन्हा केल्यानंतर काही ना काही पुरावे मागे सोडत असतो, याचाच प्रत्यय बारामती तालुक्यातल्या नशाबंदीच्या कार्यक्रमात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बारामती तालुक्यातल्या झारगडवाडी आणि सोनगावात अवैध धंदे बंद करण्याविरोधात गावकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनाची खासदार सुप्रिया सुळेंनी दखल घेतली आणि त्या थेट या गावात पोहचल्या. 


खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतल्या सभेतच सर्वांच्या भुवया उंचावणार प्रकार घडला. गावातल्या संतोष गोफळे नावाच्या तरुणानं अवैध धंदे सुरू नसल्याचा दाव्याची भर सभेत पोलखोल केली. 


याच स्टेजवर एवढा गांजा ओढला जातो की स्टेजच्या खाली गांज्याची झाडंच उगवल्याचं या तरुणानं सुप्रिया सुळेंना दाखवलं. 


एवढंच नव्हे तर थेट ही गांजाची झाडंच संतोषनं सुळेंच्या हातात दिली. सुप्रिया सुळेंनी १५ ऑगस्टपर्यंत सर्व अवैध धंदे बंद करण्याची तंबी पोलिसांना दिली आहे.