भूखंड माफियांकडून वृद्ध महिलेची `अशी` फसवणूक, तुमच्यासोबतही `असं` होऊ शकतं?
एका वृद्ध महिलेच्या नावाने असलेला भूखंड खोटे कागदपत्रे तयार करुन लाटण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
जयेश जगड, झी मीडिया, अकोला : एका वृद्ध महिलेच्या नावाने असलेला भूखंड खोटे कागदपत्र तयार करुन लाटण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अकोल्यातील भूखंड माफियांनी 75 वर्षीय वृद्ध महिलेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोला सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात माफियांविरोधात दाखल करण्यात आले आहे.
वृद्ध महिलेची भूखंड माफियांनी फसवणूक कशी केली?
अकोला शहरातील मध्यभागी असलेल्या राणीसती धाम मंदिर परिसरात कोट्यवधी रुपयांचा भूखंड असल्यामुळे माफियांकडून लाटण्याचा प्लान. वृद्ध महिलेच्या भूखंडाचे बनावट कागदपत्रे बनावण्यात आले. भूखंड माफियांनी वृद्ध महिलेवर प्रचंड दबाव टाकण्यात आला.
वृद्ध महिला या अशिक्षित असून घरकाम करतात. त्यांच्या जागेवर भूखंड माफियांनी खुला भूखंड विकत घेण्यासाठी प्रचंड दबावतंत्राचा वापर केला. यानंतर वृद्ध महिलेचे भूखंडासंदर्भात परस्पर बनावट कागदपत्र करुन भूखंड लाटला.
पोलिसांकडून गुन्हा दाखल, आरोपी कोर्टात -
फसवणुकीप्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना कोर्टातून अंतरिम जामीन मिळाला आहे. येत्या 6 जून रोजी कोर्टात सुनावणी होणार आहे. आरोपींचा जामीन रद्द करण्यासाठी पोलीस कोर्टासमोर बाजू मांडणार आहेत.
पोलिसांकडून अधिक तपास सुरु -
या प्रकरणाचा पुढील तपास सिटी कोतवाली पोलीस करतायेत. शहरातील मध्यवर्ती भागात कोट्यवधींचा भूखंड एका गरीब वृद्ध महिलेकडून हडपल्याचा प्रकार समोर आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 6 जूनच्या न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.