रत्नागिरी : सरबत किंवा शीतपेयामध्ये तुम्ही जर बर्फ घालताय मग जरा सावधान. बाजारातल्या शितपेयामध्ये घातला जाणारा बर्फ कसा तयार केला जातोय याचे धक्कादायक वास्तव पुढे आला आहे. तसेच राज्यात अनेक ठिकाणी गटारांवर बर्फाचा साठा करण्यात येत आहे. नवी मुंबईत याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे रस्त्यावरील गाड्यांवरील शीतपेय आरोग्यासाठी धोकादायक झाली आहेत. त्यामुळे प्रत्येकांनी योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तापमानाचा पारा वाढत आहे. गारगार वाटावे यासाठी आपण बाजारातील बर्फ सरबतामध्ये शीतपेयामध्ये घालतो आणि बिनधास्त पीतो. पण सरबतामध्ये आपण बिनधास्त बर्फ टाकून पितो पण तो बर्फ कसा तयार केला जातोय, ते पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. बर्फ तयार करण्यासाठी गंजलेले भांड्यांचा वापर करण्यात येत आहे. गलिच्छपणाचा कळस, गंजलेलं पाणी बर्फासाठी, बर्फाची लादी चक्क कामगार चप्पलेचे पाय देवून काढताना दिसत आहेत. हाच बर्फ तुम्ही आम्ही सरबतामधून गारेगार म्हणुन वापरतो. त्यामुळेच रत्नागिरीतल्या अन्न औषध प्रशासनाने बर्फ बनवणाऱ्या सहा कारखान्यांवर धडक कारवाई केली. इथंला बर्फ बनवण्याचा पॅटर्न पाहूनच या करखान्यांचे उत्पादन बंद करण्याचे आदेश अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत गुंजाळ यांनी दिलेत.


गलिच्छ आणि अस्वच्छतेत हा बर्फ बनवला जातोय याची माहिती अन्न औषध प्रशासनाला मिळाली. रत्नागिरीतल्या पेठकिल्ला इथंल्या बर्फ तयार करण्याच्या  कारखान्यांवर कारवाई केली. अन्न औषध प्रशासन विभाग जागा झाला आणि करावाईचा बडगा उगारला. दरम्यान, नवी मुंबईतही अनेक ठिकाणी बर्फ गटारावर प्लास्टिकमध्ये झाकून ठेवला जातो. सानपाडा येथे मासळीबाजार येथे गटारावर बर्फ दुषित पाण्याजवळच ठेवण्यात आला आहे. तोच वर्ष हात गाड्यांना पुरविला जात आहे. याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.