पुणे : कोल्हापूर पाठोपाठ पुण्यातही गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे तसेच डॉल्बी बंदी करण्यात आलीय. पुणे पोलिसांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. मिरवणुकीदरम्यान या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या मंडळांचे पदाधिकारी, साऊंड सिस्टिमचा मालक तसेच गाणी वादवणाऱ्या डीजेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३६ नुसार ही नियमावली तयार करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मिरवणुकीत ढोल ताशा वादनाबाबतही काही नियम घालून देण्यात आले आहेत. 


त्यानुसार एका पथकात ४० ढोल, १० ताशे आणि ६ झांज वादकांची मर्यादा घालून देण्यात आलीय. पथकात सर्वजण मिळून १०० जण सहभागी होऊ शकतात. संख्येबाबतच्या मर्यादेचं पालन करणं बंधनकारक असणार आहे.