चंद्रपूर :  बल्लारपूर आणि चंद्रपूर येथील रेल्वे स्थानकांचे सवाई माधोपूरच्या धर्तीवर सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगप्रसिध्द ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाबाबत जनजागृती आणि पर्यटन वाढीच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आलाय. देशाच्या रेल्वे मार्गाचा कणा असलेला 'ग्रँड ट्रंक' रेल्वे मार्ग चंद्रपूर शहरातून जातो तर बल्लारपूर हे  सर्वात शेवटचे रेल्वेस्थानक आहे. 


या स्थानाचा फायदा घेत राज्याच्या वनविभागाने चंद्रपूर आणि बल्लारपूर या दोन रेल्वे स्थानकांना 'हरित स्थानके' रूपात विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही रेल्वेस्थानकावरील खुल्या जागेत सौंदर्यीकरण आणि वने, वाघ आणि वन्यजीव सृष्टीविषयक चित्रे चितारण्यात येणार आहे. या माध्यमातून वन आणि वन्यजीव यांचे महत्व अधोरेखित करण्यात येणार आहे.