विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : बलात्काराच्या आरोपानंतर तक्रारदार महिलेकडून तक्रार वापस घेतल्यानंतर पहिल्यांदाच बीड जिल्ह्यामध्ये दाखल झालेल्या मंत्री धनंजय मुंडे यांचं कार्यकर्त्यांनी जेसीबीच्या द्वारे फुलांची उधळण करून केलं गेलं. स्वागत बलात्काराच्या आरोपानंतर आणि तक्रारदार महिलेकडून तक्रार मागे घेतल्यानंतर प्रथमच धनंजय मुंडे बीड जिल्ह्यामध्ये दाखल झाले. बीड जिल्ह्यामध्ये दाखल झालेले असताना धनंजय मुंडे यांचं जोरदार स्वागत झालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिरूर कासार याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी थेट जेसीबीमधून धनंजय मुंडे यांच्यावर फुलांची उधळण केली गेली. यावेळी धनंजय मुंडे आपल्यावरील कार्यकर्त्यांचं आणि समर्थकांचा प्रेम पाहून भावूक झाले.



कोरोनामुळे आठ महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर जनतेशी मनमोकळा संवाद साधत असून त्यामुळे भावूक झाल्याचे ते यावेळी म्हणाले. एखाद्याला भगवंताचा प्रसाद असतो, तसे तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आहेत. कठीण प्रसंगामध्ये आपण सर्वांनी साथ दिली, आशीर्वाद दिला. मी शब्दात आभार मानू शकत नाही. असे यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले. 


आपला नेता जिल्ह्यात आल्यानंतर त्यांनी आपलं प्रेम व्यक्त केलं. महत्त्वाचं म्हणजे शिरूर कासारमध्ये त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून आणि कार्यकर्त्यांचे प्रेम या एका अनोख्या पर्वणीची जिल्ह्यात चर्चा सुरू झाली.