बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) गेल्या काही दिवसांमागे नाराज असल्याचं बोललं जात होतं. पक्षाअंतर्गतच त्यांचं खच्चीकरण होत असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात होत होत्या. अशातच भाजपच्या खासदार प्रीतम मुंडेंनी (MP Preetam Munde) पंकजा मुंडे यांना पालकमंत्री करण्याची मागणी केली आहे. (MP preetam munde statement on pankaja munde)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई (Ambajogai) येथे आयोजित "समाजातील बुद्धिजिवी लोकांच्या सोबत संवाद"  या कार्यक्रमामध्ये बोलताना प्रीतम मुंडेंनी हे वक्तव्य केलं आहे. प्रीतम मुंडे यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. यादरम्यान बोलताना, पंकजा मुंडे पालकमंत्री असताना गेल्या पाच वर्षात जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग (National highway) आले, रेल्वे (Raiway) आली, महत्त्वाचे उद्योग आले. आता पुन्हा पंकजाताई पालकमंत्री झाल्या तर उरलेला विकासही पूर्ण होईल, प्रीतम मुंडे यांनी म्हटलं आहे.


शिंदे-फडणवीस सरकारने पालकमंत्र्यांची यादी जाहीर (Guardian Minister list 2022) केली त्यामध्ये अतुल सावेंकडे बीडचं पालकमंत्रीपद सोपवण्यात आलं आहे. त्यासोबतच त्यांच्याकडे जालना जिल्ह्याचंही पालकमंत्रीपद दिलं आहे. याच कार्यक्रमादरम्यान पंकजा मुंडे यांनी थेट पंतप्रधान मोदींना (PM Narendra Modi) आव्हान देणार वक्तव्य केलं आहे. 


पंकजा मुंडे यांनी काँग्रेस (Congress) पक्षात वंशवादाचं राजकारण सुरु असल्याचं सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वंशवादाचं राजकारण संपवायचं आहे. मी सुद्धा वंशवादाचं प्रतीक आहे मात्र मला कोणी संपवू शकत नाही, मोदीजींनी सुद्धा ठरवून मला संपवायचा प्रयत्न केला तर ते सुद्धा मला संपवू शकत नाहीत, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. पंकजा मुंडेंचं हे वक्तव्य राज्यभर चर्चेत आलं आहे. 


राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर, सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया, चंद्रकांत दादा पाटील- पुणे, विजयकुमार गावित- नंदुरबार, गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड, गुलाबराव पाटील - बुलढाणा, जळगाव, दादा भुसे- नाशिक, संजय राठोड- यवतमाळ, वाशिम, सुरेश खाडे- सांगली, 


संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), उदय सामंत- रत्नागिरी, रायगड, तानाजी सावंत-परभणी, उस्मानाबाद (धाराशिव), रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग, अब्दुल सत्तार- हिंगोली, दीपक केसरकर -मुंबई शहर, कोल्हापूर, अतुल सावे - जालना, बीड, शंभूराज देसाई - सातारा, ठाणे, मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर