विष्णु बुरगे, झी मीडिया, बीड: जिल्ह्याच्या राजकारणाला पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यातला राजकीय संघर्ष (Political Crisis) नवा नाही मात्र या दोघांच्या संघर्षामध्ये धनंजय मुंडे हे सरस ठरत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्याभरात पाहायला मिळत आहे. पांगरी गोपीनाथ गड या ठिकाणी झालेल्या सेवा सोसायटीच्या निवडणुकीमध्ये तब्बल तीस वर्षे भाजपची सत्ता होती त्या ठिकाणी आता राष्ट्रवादीची (NCP) सत्ता आली आहे या निमित्ताने पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांचे प्राबल्य बीड जिल्ह्यामध्ये असल्याचं समोर आले. (Beed News After 30 year NCP in power in Pangri gopinath gad Seva Society election latest maharashtra news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पांगरी गोपीनाथ गड या ठिकाणी वर्षानुवर्षे भाजपची सत्ता होती मात्र या ठिकाणी सेवा सोसायटीमध्ये तीस वर्षांमध्ये पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसने (Congress) भाजपला हरवत 13 पैकी 13 जागावर विजय मिळवलाय. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचा सुपडा साप झालाय तर धनंजय मुंडे यांचं वर्चस्व यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले. रात्री उशिरा हे निकाल हाती आले आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. 


परळी नगरपरिषदेचे गट नेते वाल्मिकी कराड धनंजय मुंडेंचे अत्यंत जवळचे मानले जातात. निवडणूक असो वा कुठला कार्यक्रम त्याची संपूर्ण जबाबदारी वाल्मिक कराड यांच्या खांद्यावर असते. पांगरी हे गाव वाल्मिक कराड यांचे आहे. आणि याच परिसरातून विधानसभा निवडणुक विजयाचे गणित जुळविले जातं. वाल्मिक कराड यांची या भागात मजबूत पकड आहे. सर्वसामान्यांना तात्काळ मदत करणारे अण्णा म्हणून त्यांची खरी ओळख आहे. आमदार धनंजय मुंडेंच्या माघारी वाल्मिक कराड यांनीच या निवडणुकीचे सूत्र हलविलं. त्यामुळे या निवडणुकीत वाल्मिकी कराड यांना किंगमेकर मानलं जातं. 


हेही वाचा - Video : घराला लागली आग! लग्नासाठी जमवलेले 85 हजार रोख पैसे आणि सोने जळून खाक


जनसंपर्क कमी झाल्याने भाजपला पराभवाचा झटका...


भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय वाद सर्वश्रुत आहे. पंकजा यांचा विधानसभेत दारूण पराभव झाल्यानंतर देखील त्या मतदारसंघात जनतेच्या संपर्कात राहिल्या. मात्र अवतीभोवती सतत गराडा घालून फिरणाऱ्या काही कार्यकर्त्यामुळे सर्वसामान्य नागरिक पंकजा यांच्यापासून दुरावल्या गेल्याचे जाणकारांचे मत आहे. त्याचाच फटका अनेक निवडणुकीत पंकजा यांना बसत आहे. एकही कार्यकर्ता पाठीशी नसणारे स्वयंभू नेते पंकजा यांच्या गटात सामील झाल्याने विजयी जागा देखील पराभवाच्या खाईत जात आहेत, त्यामुळे पंकजा मुंडे यांना वेळीच सावध होण्याची गरज असल्याची चर्चा सर्वसामन्यातून होत आहे.


2019 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान (2019 Assembly Elections) पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आणि धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस कडून विजयी झाले. त्यानंतर महाविकास आघाडीची सत्ता आली आणि या सत्तेमध्ये धनंजय मुंडे हे पालकमंत्री देखील झाले. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या बहिण भावामध्ये निवडणुकीमध्ये प्रत्येक चुरस पाहायला मिळते. आता ग्रामपंचायत सेवा सोसायटी यामध्ये थेट संघर्ष पाहायला मिळतोय आणि यामध्ये मागील काही वर्षांमध्ये धनंजय मुंडे हे सत्ता काबीज करताना दिसत आहेत. 


हेही वाचा - Video : घराला लागली आग! लग्नासाठी जमवलेले 85 हजार रोख पैसे आणि सोने जळून खाक


2015 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे विजयी झाल्या आणि त्यानंतर त्यांना मंत्रिपद देखील मिळालं मंत्रिपदाच्या काळामध्ये धनंजय मुंडे यांना विरोधी पक्षनेता (oppostion Leader) करून राष्ट्रवादी काँग्रेसने बळ दिलं. त्याच्याच प्रभावामुळे धनंजय मुंडे हे 2019 मध्ये विधानसभेत विजयी झाले. 2017 मध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक झाली. यामध्ये भाजपची सत्ता होती मात्र अडीच वर्षांमध्ये धनंजय मुंडे पालकमंत्री झाल्यानंतर ही सत्ता देखील राष्ट्रवादीकडे खेचून आणली. 


पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे राजकीय संघर्ष सुरू असताना निवडणुकांमध्ये मात्र धनंजय मुंडे यांना यश मिळताना दिसतंय. तर भाजप पंकजा मुंडे यांना वेळोवेळी डावलत असल्यामुळे पंकजा मुंडे यांना राजकीय बळ मिळत नाही आणि निवडणुकांमध्ये देखील पराभवांचा सामना करावा लागतोय. त्यामुळे पंकजा मुंडे या बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळतंय.