Abdul Sattar Constrovesy: नेहमीच आपल्या वक्तव्यांनी चर्चेत असलेले राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. बीडमध्ये (Beed News) बोलताना त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरु झाल्या आहेत. सत्तार यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. आधी जे गरिब खात होते ते आता श्रीमंत खात आहेत, असे अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला होता. त्यातच आता सत्तार यांच्या या विधानाने पुन्हा एकदा चर्चा सुरु झाल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाले अब्दुल सत्तार


"आंतरराष्ट्रीय पौष्टिक आहार दिवस आपण साजरा करु लागलो. एक वेळ होती जेव्हा हे जेवण गरिबांचे होते. ज्वारी, बाजरी हे पीक पहिले गरिब खात होते. वेळ बदलली. जे गरिब खात होते ते आता श्रीमंत खातात. जे श्रीमंत खात होते ते आता गरिब खातात. हा बदल रासायनिक खतामुळे मोठ्या प्रमाणावर उत्पन घेतल्यामुळे होतो," असे अब्दुल सत्तार म्हणाले.


बीडमध्ये कृषी विभागातर्फे मिलेट दौड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी हे विधान केले होते. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या रॅलीमध्ये मंत्री अब्दुल सत्तार हे सहभागी झाले होते. यादरम्यान बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणापासून ते कारंजापर्यंत सत्तार यांनी अनेक अधिकाऱ्यांना मागे टाकत जवळपास 500 मीटर दौड केली. यामुळं सत्तरांच्या नेहमीच्या चर्चेत आता फिटनेसच्या चर्चेची भर पडलीय.


दरम्यान, यावेळी बोलताना अवकाळी पावसाने नुकसान झाल्याचे अब्दुल सत्तार म्हणाले. नुकसान झाले आहे त्याचे लवकरच पंचनामे होतील. नुकसान ग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. काही ठिकाणी कृषी अधिकारी संपात सहभागी आहेत. परंतु वेळ पडल्यास बीएससी ऍग्री झालेले तरुणांची मदत घेऊन तोडगा काढला जाईल , असं आश्वासन सत्तारांनी दिले आहे.


अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात - अब्दुल सत्तार


"शेतकरी आत्महत्या काही आजचा विषय नाही, अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी कृषी आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी तयार करण्यात आली," असे विधान अब्दुल सत्तार यांनी केले होते.