बीडचं पालकमंत्रिपद अजितदादांकडे? महायुतीसह विरोधकांचीही दादांच्या पालकमंत्रिपदाला पसंती
Beed Ajit Pawar : सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरणानंतर अजित पवारांनी बीडचे पालकमंत्री पद स्विकारावं अशी मागणी
Beed Ajit Pawar : बीडच्या मस्साजोगचे संरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडचा पालकनमंत्री कोण होणार याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होऊ लागले. धनंजय मुंडे यांना पालकमंत्री करू नये अशी मागणी विरोधकांनी केलीय. अशातच आणखी एक मुद्दा चांगलाच गाजतोय तो म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पालकमंत्रीपद. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांनी बीडचे पालकमंत्री पद स्विकारावं अशी मागणी केलीय.
बीडमधील सरपंच हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडेंना बीडचे पालकमंत्री देऊ नये अशी मागणी विरोधकांनी केली आहे. त्यामुळे बीड जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी पालकमंत्रीपदाबाबत मोठी मागणी केली आहे. बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अजित पवारांनी घ्यावं. अशी मागणी बजरंग सोनवणे यांनी केली आहे.
'आमची पहिली पसंती ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. जर मुख्यमंत्री झाले नाहीत तर अजितदादा झाले तरी चालेल अशी प्रतिक्रिया', भाजप आमदार सुरेश धस यांनी दिलीय.
दरम्यान, राष्ट्रवादीनं बीडचं पालकमंत्रीपद गेलं तर पालकमंत्री कोण करायचा हे राष्ट्रवादीनं ठरवायचं आहे अशी प्रतिक्रीया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
सरपंच हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीसोबतच बीडमधील राजकारणाचीही जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री करण्याला बीडमधील सर्वपक्षीय आमदारांचा विरोध केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बीडच्या पालकमंत्रीपदाबाबत काय निर्णय घेतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री असताना वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचे म्हटले जाते. तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील खंडणीच्या गुन्ह्यात सध्या तो सीआयडी कोठडीत आहे. धनंजय मुंडे हे पालकमंत्री असताना वाल्मिक कराड यांनी आपल्या वर्चस्वात वाढ केली होती.