धक्कादायक ! मित्राच्या लग्नात बेधुंद होऊन नाचला पण दुर्दैवाने मृत्यूने गाठला
मित्राच्या लग्नात बेधुंद नाचणाऱ्य़ा तरुणांचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू.
बीड : बीडमधून एक धक्कादायक बातमी मित्राच्या लग्नात बेधुंद नाचणा-या वैभव राऊत या तरूणाचा हृदयविकाराने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यातील शिंदेवाडीत ही घटना घडली आहे. माने-कोळसे विवाहाचं आयोजन करण्यात आलं होतं. नवरदेव अक्षय मानेचे मित्रही लग्नसोहळ्यासाठी आले होते. संध्याकाळच्या सुमारास नवरदेवाची वाजतगाजत वरात निघाली होती. त्यात वैभव राऊत हा तरूणही बेधुंद होऊन नाचत होता.
नवरदेवाची वराच लग्नमंडपात येताच अस्वस्थ वाटू लागल्यानं वैभव खुर्चीवर बसला. तिथेच त्याला हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला.
मित्रांनी वैभवला माजलगावाच्या खासगी रूग्णालयात दाखल केलं, मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनं संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
बातमीचा व्हिडिओ