बीड : टोमॅटोला बाजारात भाव मिळत नसल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय. स्थानिक बाजारात दोन रुपये किलोने दर मिळत असल्याने बीडच्या पाटोदा इथल्या शेतकऱ्याने एक एकर वरील टोमॅटो बांधावर फेकून दिलाय.


शेतकरी त्रस्त 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 पाटोदा तालुक्यातील चिखली गावचे भागवत राऊत यांनी ५० हजार रुपये खर्च करून  एक एकर जमिनीवर टोमॅटोची लागवड केली, मात्र टोमॅटोला १ रुपया आणि २ रुपयांचा दर मिळत असल्याने त्रस्त होऊन राऊत यांनी टोमॅटोचे झाडं उपटून बांधावर फेकून दिली. 


दुहेरी संकट  


किमान दीड लाखाचे उत्पन्न  मिळण्याची त्यांना आशा होती मात्र दुष्काळाच्या झळा आणि शेतमालाला नसलेला हमीभाव या दुहेरी संकटात सापडून राऊत यांच्या पदरी केवळ ५ रुपये हाती आले.