यवतमाळ : Yavatmal city posters : राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या यवतमाळ दौऱ्यादरम्यान  'आमचं ठरलंय' अशा आशयाचे फलक लावण्यात आल्यानं चर्चांना उधाण आले आहे. अजितदादांचे निकटवर्तीय माजी आमदार संदीप बाजोरिया हे स्वतः आणि त्यांचे समर्थक हे देखील अजित पवार यांच्या दौऱ्यात गैरहजर होते. त्यामुळे शहरात लावण्यात आलेल्या बॅनरशी बाजोरिया यांच्या नाराजीचा तर संबंध नाही ना, अशाही चर्चांना ऊत आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र बॅनरवर कोणतंही चिन्ह, तसंच नेत्यांचंही नाव नसल्यानं नेमके हे फलक कोणी लावले आणि कशासाठी याबाबतचे कारण अद्याप समोर आलेलं नाही. पण, राष्ट्रवादीच्या गटबाजीतून ही फलकबाजी केली असल्याची चर्चा सुरु आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. ते यवतमाळ शहराला भेट देणार आहेत.


यवतमाळ येथे येण्यापूर्वी विश्राम भवन परिसरात  'आमचं ठरलंय' या पोस्टरबाजीने चर्चेला उधाण आले आहे. या आशयाचे पोस्टर लावून पोस्टर मोहीम हाती घेतलेली आहे. मात्र, हा फलक नेमका कोणी आणि का लावला, हे अद्याप समोर आलेले नाही. या फलकावर पक्षाचे कोणतेही चिन्ह किंवा नेत्याचे नाव नाही. त्यामुळे या फलकाबाबत प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीतील गटबाजीमुळे ही पोस्टरची लढाई झाल्याची चर्चा सुरू आहे. शिंदे गटाकडून असे पोस्टर लावले आहे का, याचीही  शक्यता वर्तवण्यात येत आहे.