Ganesh Chaturthi 2023 : मुंबईतील गणेशोत्सव म्हणजे मुंबईची शान. गणेशभक्तांसाठी आनंदची बातमी. आता गणेशभक्तांना रात्रभर सार्वजनिक गणपती बाप्पांचं दर्शन घेता येणार आहे.  गणेशभक्तांसाठी बेस्ट आणि रेल्वेची विशेष सेवा पुरवली जाणार आहे. यामुळे गणेशभक्तांची गणेशोत्सावात मुंबईत रात्रभर प्रवास करण्याची सोय 


बेस्टचा रात्रभर बस सेवा सुरु करण्याचा निर्णय 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गणेश भक्तांची गैरसोय होऊनये म्हणून बेस्टनं रात्रभर बस सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी बेस्टनं मुंबईतील 9 मार्गांवर 27 अतिरिक्त बसेस सुरु ठेवल्यात 19 सप्टेंबर ते 27 सप्टेंबरपर्यंत या अतिरिक्त बसगाड्या चालवल्या जाणार आहेत .या बस रात्री अकरा ते पहाटे सहा वाजेपर्यंत उत्तर पश्चिम मुंबईकडे गिरगाव, परळ, लालबाग, चेंबूरमार्गावर सेवेत असतील.


मुंबईत मध्यरात्री विशेष लोकल चालवण्याची रेल्वे पोलिसांची मागणी


गणेशोत्सवात भाविकांची गैरसोय होऊनये म्हणून मुंबईत मध्यरात्री विशेष लोकल चालवण्याची मागणी रेल्वे पोलिसांनी रेल्वे प्रशासनाकडे केलीये. 19 ते 28 सप्टेंबरपर्यंत गणेशोत्सव आणि अनंत चतुर्दशीसोबतच ईद-ए-मिलाद आहे. या उत्सवकाळातील गर्दी लक्षात घेऊन रेल्वे स्थानकांवर रेल्वे पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केलाय. दरम्यान गर्दीचा गैरफायदा घेऊन महिलांच्या छेडछाडीच्या घटनांना आवर घालण्यासाठी रेल्वे पोलिसांनी विशेष खबरदारी घेतलीये. प्रत्येक रेल्वे प्लॅटफॉमवर सीसीटीव्हीची करडी नजर असणार आहे.. महिलांच्या सुरक्षेकडे विशेष भर देण्यात आला असून रात्री उशिरा धावणा-या लोकल फे-यांमध्ये सुरक्षारक्षक तैनात करण्यात आलेत.


बसेस कोकणात रवाना झाल्याने ठाणेकरांचे हाल


ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील 500 पेक्षा अधिक बसगाडय़ा गणेशोत्सवानिमित्ताने कोकणात रवाना झालेत. मात्र, या दोन्ही जिल्ह्यातील ग्रामीण भागात एसटीवर अवलंबून असणाऱ्या प्रवाशांना ऐन सणासुदीच्या दिवसात गैरसोयीला सामोरे जावे लागतंय.