प्रवीण तांडेकर, झी मीडिया, भंडारा : भरधाव ट्रेलर (Trailer) चालकाने दुचाकीवरील पोलिसाला चिरडल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा (Bhandara News) जिल्ह्यात घडला आहे. या अपघातात पोलीस (Bhandara Police) कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे 24 तासातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या अपघाताची ही दुसरी घटना आहे. भंडाराऱ्यातील (Bhandara Crime) पवनी तालुक्यात पोलिसांच्या गाडीला अपघात झाला आहे. यामध्ये दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भरधाव ट्रेलर चालकाने दुचाकी वरील पोलीस कर्मचाऱ्याला चिरडल्याची घटना भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकात घडली आहे. ट्रेलरच्या चाकाखाली आल्याने पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. राजपूत मते (56) असे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असल्याचे समोर आले आहे. भंडारा पोलीस लाईन येथे राहणारे राजपूत मते हे लाखनी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक पदावर कार्यरत होते.


रविवारी राजपूत मते हे सकाळी बाजारातून भाजी घेऊन दुचाकीने घरी जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेलरने त्यांना धडक दिली. या धडकेत राजपूत मते हे थेट ट्रेलरच्या चाकाखाली आले. चाकाखाली चिरडले गेल्याने राजपूत मते यांचा जागीच मृत्यू झाला. 


या घटनेनंतर चौकात कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांनी ट्रेलर चालकाला ताब्यात घेतले. त्यानंतर मृत राजपूत मते यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मृतक राजपूत मते यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी,पत्नी आणि आई असा परिवार आहे. विशेष म्हणजे भंडारा शहरात 24 तासात अपघाती मृत्युची दूसरी घटना घड़ल्यांने शहरातील वाहतूक व्यवस्था किती धोकादायक ठरत आहे याची प्रचिती येत आहे.


पवनी पोलीसांच्या वाहनाचा अपघात


भंडारा जिल्ह्याच्या पवनी पोलीस ठाण्याच्या वाहनाचा अपघात झाला असून दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. रविवारी सकाळच्या सुमारास पोलिसांना फोन आल्यामुळे ते निघाले होते. रस्त्यावरून जात असताना खैरी दिवान गावाजवळ अचानक एक रानडुक्कर पोलिसांच्या गाडीसमोर आले. रानडुक्कराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे पोलिसांचे वाहन रस्त्याच्या खाली उतरताच कॅनलला जाऊन धडकले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.