Video: जंगली हत्तींचा हैदोस; जीवाची पर्वा न करता अनेकजण फोटो काढण्यासाठी रस्त्यावर
Bhandara Elephant News: हल्ली अनेकदा आपल्याला जंगलाच्या भागाच्या ठिकाणी हत्ती (elephant) कळप जाताना येताना दिसतो. त्यामुळे हत्तींची नजर कुठेही पडली तरी आपल्याला कायमच त्यांच्याबद्दल भिती वाटत राहते असाच एक प्रकार भंडारा येथे मोहघाटा (mohghata at bhandara) परिसरात घडला आहे.
प्रवीण तांडेकर, झी मीडिया, भंडारा: हल्ली अनेकदा आपल्याला जंगलाच्या भागाच्या ठिकाणी हत्ती (elephant) कळप जाताना येताना दिसतो. त्यामुळे हत्तींची नजर कुठेही पडली तरी आपल्याला कायमच त्यांच्याबद्दल भिती वाटत राहते असाच एक प्रकार भंडारा येथे मोहघाटा (mohghata at bhandara) परिसरात घडला आहे. जंगली हत्तींची दहशत पाहून आजूबाजूच्या परिसरातील लोकंही रस्त्यावर येऊ लागली आणि आपल्या जीवाची पर्वा न करता हत्तींच्या कळपाचे फोटो आणि व्हिडीओज (people capturing photos and videos) काढू लागली. सध्या याच प्रकारचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (bhandara elephant news elephants goes wild near mohghata in bhandara)
मध्यंतरी असेच अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. जंगली हत्तींची दहशत (terror) हळूहळू वाढू लागली आहे. त्यामुळे अशा परिसरातील लोकंही चितेंत असतात. आता या घटनेनंही पुन्हा एकदा परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्तीनं (elephant attack) माणसांवरही अनेकदा वार केले आहेत. त्यातून हत्ती अनेकदा घरातही घुसतात आणि नुकसानही करतात. मोहघाट परिसरात आलेल्या या हत्तींनी पिकांचेही बरेच नुकसान केल्याची बातमी समोर येेत आहे. मोहघाट परिसरात सध्या या जंगली हत्तींच्या वावरानं भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा - काहीही! पालिकेच्या आशीर्वादाने सापांची चंगळ, मारणार महागड्या उंदरांवर ताव
पथकं तैनात
गडचिरोली आणि गोंदिया (gondia and gadchiroli) जिल्ह्यानंतर हत्तीचा कळप सोमवारी भंडारा जिल्ह्यात दाखल झाला नंतर मंगळवारी (tuesday) या हत्तीचा संचार साकोली तालुक्यातील मोहघाटा जंगलात असून, हत्तींवर वॉच ठेवण्यासाठी वनविभागाचे विविध पथके जंगलात तैनात आहेत. पश्चिम बंगालच्या सेज संस्थेच्या हत्ती नियंत्रण पथकाचीही मदत घेतली जात आहे. वरिष्ठ वनाधिकारी मोहघाटा जंगलात तळ ठोकून आहेत.
दक्षता घेण्यासाठी सज्ज
साकोली तालुक्यातील सानगडी वनपरिक्षेत्रात सोमवारी हत्तींचा कळप दाखल झाला. या कळपाने झाडगाव, केसलवाडा, सिलेगाव शेतशिवारातील धान आणि ऊस पिकांचे नुकसान केले. दरम्यान, मंगळवारी हत्तीचा कळप मोहघाटा जंगलात (jungle) पोहोचला. मोहघाटा जंगलात वनविभागाचे भंडारा व गोंदिया येथील जलद प्रतिसाद दल, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे पथक तळ ठोकून आहेत. मोहघाटा जंगलात असलेले हत्ती मानवी वस्तीत शिरणार नाही, याची दक्षता वनविभागाकडून (forest department) घेतली जात आहे. भंडारा वनविभागाचे सुमारे 60 कर्मचारी जंगल परिसरात तैनात आहेत. ड्रोन कॅमेऱ्याद्वारे हत्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.