भंडारदऱ्याजवळ धबधब्यांवर पर्यटकांची मौज
मुसळधार पाऊस आणि भंडारदरा धरणातून पाणी सोडल्याने परिसरातील सर्व धबधबे सुरू झालेत.
अहमदनगर : मुसळधार पाऊस आणि भंडारदरा धरणातून पाणी सोडल्याने परिसरातील सर्व धबधबे सुरू झालेत. रंधा फॉल, अम्ब्रेला फॉल आणि सीनव्ह्यू फॉल सर्वच ठिकाणी पर्यटकांची गर्दी झालीय. मुंबई गुजरात राज्यातून निसर्गाचं देखणं रुप पाहण्यासाठी आतापर्यंत दीड ते दोन लाख पर्यटकांनी हजेरी लावली.
पावसाळ्याखेरीज कधीही ऑफ सिझन असणार भंडारदरा मराठवाड्याला पाणी सोडल्याने तेजीत आहे. इथे अधिक सुविधा मिळाल्यास गुजरातमधील सापुता-याप्रमाणे पर्यटन वाढू शकते. नाशिक घोटी भंडारदरा रस्ता खराब झाल्याने पर्यटक काहीसे नाराज आहेत. मात्र लोणावळा खंडाळा परिसराला पर्याय म्हणून या सह्याद्री खो-यातील पर्यटनाला चालना देण्याची गरज आहे.