राहुल गांधींचा विरोध करणारे मनसैनिक पोलिसांच्या ताब्यात, सभेत राडा होणारच मनसैनिकांचा इशारा
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी मनसे (MNS) आक्रमक, सभेत राडा घालण्याचा मनसे नेत्यांचा इशारा
Bharat Jodo Yatra : सावरकरांवर (Vinayak Damodar Savarkar) टीका केल्यामुळे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याविरोधात मनसे (MNS) कमालीची आक्रमक झालीय. मुंबईसह ठिकाठिकाणाहून निघालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी चिखलीत जोरदार निदर्शनं केली. शेगावच्या (Shegoan) दिशेनं निघालेल्या या कार्यकर्त्यांना चिखलीत अडवण्यात आलं. त्यांनी त्याठिकाणीच ठिय्या मांडला आणि रस्त्यावर असलेली राहुल गांधींची पोस्टर्सही फाडण्यात आली. यावेळी पोलिसांनी संदीप देशापांडे (Sandeep Deshpande), नितीन सरदेसाई (Nitin Sardesai) आणि अविनाश जाधवांसह (Avinash Jadhav) अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. या सर्वांना चिखलीतल्या गेस्ट हाऊसवर ठेवण्यात आलंय. राहुल गांधींच्या सभेत राडा करणारच असा इशारा मनसे आंदोलकांनी दिलाय. तर मनेसला आपलं मत मांडू देण्यासाठी चिखलीत सभा घेण्याची परवानगी देण्याची मागणी मनसे नेते संदीप देशपांडेंनी केलीय.
पोलीस अॅक्शन मोडवर
राहुल गांधींविरोधात मनसेनं आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर राज्यातील पोलीसही (Police) अॅक्शन मोडवर आले. जिथं जिथं मनसेनं आंदोलन केलं तिथं पोलिसांनी मोठा फौजफाटा ठेवत परिस्थिती नियंत्रणात आणली. मनसे कार्यकर्त्यांना शेगावच्या आधी चिखलीतच पोलिसांनी अडवलं अनेक मनसैनिकांना स्थानबद्ध केलं. कार्यकर्त्यांना चिखली बाहेर जाऊ न देण्यासाठी चिखलीमध्ये 200च्या वर पोलीस कर्मचारी तैनात आहेत. सध्या सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेऊन चिखली गेस्ट हाऊसला नेण्यात आलंय. अकोल्यात शेगावाकडे जाणाऱ्या मनसेच्या 100 वर कार्यकर्त्यांना अकोला पोलिसांनी स्थानबद्ध केलंय.
राहुल गांधींच्या शेगावाच्या सभेत मनसे गोंधळ घालण्याची शक्यता असल्याने, रस्ते मार्गावरील पोलिसांनी ठिकठिकाणी चेक पोस्ट लावलेत. मनसे कार्यकर्ते रेल्वे मार्गाने येण्याची शक्यता असल्याने रेल्वे स्टेशनवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे.
म्हणजे मराठी माणसाचा अपमान
सावरकरांचा अपमान म्हणजे मराठी माणसाचा अपमान असा आरोप मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केलाय. ठाकरे गटाची (Thackeray Group) भूमिका बोटचेपी आहे, उलट राहुल गांधी यांना झप्पी मारणा-यांना मराठी माणूस, देश माणूस कधीच माफ कऱणार नाही अशी टीका शेलारांनी केलीय.
भाजपकडून जोरदार निदर्शनं
राहुल गांधींनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याबाबत पुणे मुंबईत भाजपकडून (BJP) निषेध करण्यात आला.. पुण्यातील काँग्रेस भवनासमोर हे आंदोलन करण्यात आलं.. तसंच पुण्यातील काँग्रेस भवनात भाजपनं बॅनरबाजी केली.. तर इकडे मुंबईतही राहुल गांधींच्या निषेधार्थ भाजपनं आंदोलन केलं.. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्ते दादरमधील टिळक भवनाकडे जाणार होते.. मात्र पोलिसांनी दादर फुल मार्केटजवळच या कार्यकर्त्यांना रोखलं.. त्यानंतर पोलिसांनी या कार्यकर्त्यांची धरपकड केली. तर नाशिकमध्येही भागूर येथे निदर्शने करण्यात आली...यावेळी सर्व भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते...विशेष म्हणजे शिंदे गटाचे खासदार हेंमंत गोडसे यात सहभागी झाले.