अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती :  अंबानगरी अमरावतीतून मोठी बातमी समोर येत आहे. भीम ब्रिगेडडून (Bhim Brigade) आमदार रवी राणा आणि खासदार रवी राणा या दाम्पत्याचा (Rana Couple) विरोध करण्यात आला आहे. या भीम ब्रिगेडकडून राणा दाम्त्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. या निमित्ताने राणा दाम्पत्य आणि भीम ब्रिगेडचे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी भीम ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतलंय. (bhim brigade opposed to ravi rana and navneet rana at amravati over to hanuman chalisa controversy)


नक्की प्रकरण काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हनुमान चालिसा प्रकरणानंतर तब्बल 36 दिवसांनी अमरावतीत पोहचले. त्यानंतर युवा स्वाभिमानी पक्षाकडून या दाम्पत्याचं जंगी स्वागत केलं. या दरम्यान राणा दाम्प्त्यांनी नागपुरात हनुमान चालिसेचं पठण केलं. 


राणा दाम्पत्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ हनुमान चालिसेचं पठण करण्याचा प्रयत्न केला. यावरुन या वादाला तोंड फुटलं. बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर हनुमान चालिसेचं नाही, तर संविधानाचं पठण करावं, या मुद्द्यावरुन भीम ब्रिगेडने यांचा विरोध केला. यावेळेस पोलिसांनी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.