पुणे : कोरेगाव-भीमाप्रकरणी पुणे पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या पाचही आरोपींची स्थानबद्धता आणखी चार आठवड्यांसाठी वाढवण्यात आलीय. सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी दाखल जनहित याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश दीपक मिश्रा अध्यक्षतेखालील खंडपीठानं निर्णय दिला. याप्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडेच राहणार असल्याचं बहुमताच्या निकालात म्हटलंय.


तपासाबाबत ताशेरे


 तीन पैकी दोन न्यायायमूर्तीनी हा निकाल दिलाय. दरम्यान न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी मात्र निकालाशी सहमत नव्हते. त्यांनी पुणे पोलीसांनी केलेल्या तपासाबाबत ताशेरे ओढले असून, पोलिसांनी घेतलेली पत्रकार परिषदेबद्दलही नाराजी व्यक्त केलीय.याप्रकरणीची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी व्हावी असं न्य़ा.चंद्रचूड यांनी आपल्या निकाला नमूद केलंय.