Pune Crime News : महिला आयोगच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या बदनामी प्रकरणात पुणे पोलिसांची मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. सोशल मिडियावर रुपाली चाकणकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली होती. पुणे याबर पोलिस या प्रकरणाचा तपास करत होते. 


रुपाली चाकणकर यांच्या भावाने केली होती तक्रार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर अकाउंटवर रुपाली चाकणकर यांच्याबाबत बदनामीकारक पोस्ट करणाऱ्यात आली होती. रुपाली चाकणकर यांच्याविरोधात अश्लील शब्दात पोस्ट करणाऱ्या आरोपींना पुणे सायबर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी रुपाली चाकणकर यांचे बंधू संतोष बबन बोराटे यांनी फिर्याद दिली आहे. जयंत रामचंद्र पाटील रा. धनगरवाडी जिल्हा सांगली, वसंत खुळे (वय ३४, रा. राहाटी, ता. परभणी जिल्हा परभणी, प्रदीप कणसे (रा. पुणे ) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींचे नाव आहेत.


रुपाली चाकणकर यांच्या विरोधात अश्लिल पोस्ट


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या पोस्ट वर अश्लील शब्दात कमेंट करणाऱ्या आरोपी विरोधात तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार कंमेंट करणाऱ्या आरोपीच्या प्रोफाइलची पडताळणी करून त्यांचा तपास घेत त्यांना ताब्यात घेण्यात आला आहे. आरोपींना पोलिसांनी  नोटीस बजावली आहे.


ललित पाटील प्रकरणी आता येरवडा कारागृह प्रशासन रडारवर


ललित पाटील प्रकरणी आता येरवडा कारागृह प्रशासन रडारवर आलंय. कारागृहातील समुपदेशक आणि वैद्यकीय अधिकारी या दोघांना अटक करण्यात आलीय. सुधाकर इंगळेमार्फत डॉ. संजय मरसळे यांना पैसे मिळाल्याचं तपासात समोर आलंय. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केलीय.


मरसळे हे ललित पळून जाण्याच्या 2 दिवस आधी त्याच्याशी संपर्कात होता. डॉ. संजय मरसळे यांनीच पैसे घेऊन ललितला ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी रेफर केल्याचं समोर आलंय. डॉ संजय मरसळे यांच्या मोबाईलमध्ये ललितचा साथीदार अभिषेक बलकवडेचे कॉल रेकॉर्ड्स आढळलेयत. त्यामुळे आता येरवडा जेल प्रशासन रडारवर आलंय.