मुंबई : राज्यात शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतरही खोक्याच राजकारण थांबण्याच नाव घेत नाही. शिंदे आणि ठाकरे गटात खोक्यावरून राजकारण तापतचं आहे. याच राजकारणात आता शिंदे गटातील रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंवर निषाणा साधला आहे. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी 100 कोटी घेतले असल्याचा गंभीर आरोप रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केला आहे. या आरोपांवर आता आदित्य ठाकरे काय प्रत्युत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)  यांचा नुकताच कोकण दौरा पार पडला. या कोकण दौऱ्यात आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातील नेत्यांवर गंभीर आरोप केले. या आरोपांवर आता शिंदे गटातील बडे नेते रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिले आहे. खोक्याचं राजकारण फक्त आमदारांना बदनाम करण्यासाठी केले जात असल्याचं रामदास कदम (Ramdas Kadam)  यांनी म्हटले आहे. तसेच आदित्य ठाकरेंनी १०० कोटी घेतल्याचा गंभीर आरोप कदम यांनी केला आहे.  


खोक्याची भाषा आदित्य सारख्या माणसांनी करू नये, 100- 100 खोके कसे आणि कुठून घ्यायचे, हे सगळ त्यांना माहितीय, असा टोला कदम यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे. 



प्रदुषण नियंत्रण महांमंडळाच 100 कोटी पर्यावरण विभागातून वळवून घेतल्याचा आरोप त्यांनी आदित्य ठाकरे   (Aaditya Thackeray) यांच्यावर केला आहे. त्याच आता काय झालं आहे, याची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांना पत्र लिहल्याचेही त्यांनी म्हटले आहे. हे पत्र लिहून त्यांनी चौकशीची मागणी केली आहे. आता कदम यांच्या या आरोपानंतर मुख्यमंत्री या चौकशीचे आदेश देणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.