नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडच्या टोल नाक्या जवळ पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मुंबईकडे जाणाऱ्या बोलेरो गाडीतून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय. 


जिवंत काडतुसे जप्त, तिघांना ताब्यात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या १५ पिस्तुलं आणि ३ हजार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. याप्रकरणी ३ जणांना ताब्यात  घेण्यात आलंय. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल शस्रसाठा कोठून आणला आणि कुठे घेऊन जात होते याचा तपास सुरु आहे. 


रिव्हावलर दाखवून पळून गेले आणि ...


पोलिसांनी गाडीची कसून तपासणी केल्यानंतर २५ रायफल देखील सापडल्या असून आरोपी हे मुंबईचे असल्याचे समजते. मालेगावच्या एका पेट्रोल पंपावर गाडीत पेट्रोल टाकल्यानंतर त्याचे पैसे न देता रिव्हावलर दाखवून पळून गेले. पंप चालकाने मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांना घटनेची माहिती दिली त्यांनी तातडीने चांदवड पोलिसांशी संपर्क करून नाकेबंदी करण्याचा आदेश दिला.  



पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न


नाकेबंदी केल्यानंतर बोलेरोला टोल नाक्या जवळ अडविण्यात आले असता आरोपींनी पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीसही तयारीत असल्याने त्यांनी आरोपींना ताब्यात घेतले आणि पोलीस स्थानकात आणले. येथे गाडीची तपासणी केल्यानंतर त्यात २५ रायफल, १५ पिस्तुल आणि सुमारे ३ हजार जिवंत काडतुसे सापडली.