मुंबई : घातपाताच्या कटाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सुधन्वा गोंधळेकर कडून मोठा शस्त्रसाठा जप्त आलायं. सुधन्वा कडून १० गावठी पित्सुल, १ गावठी कट्टा, चॉपर, चाकू आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलंय. सणासूदीच्या दिवसात वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर घातपात घडवण्याच्या बेतात होते असे सांगितले जात आहे. 


कुटुंबीयांना धक्का 


अवैध शस्त्रसाठा प्रकरणाशी आपल्या मुलाचा काहीही संबंध नसल्याचे आरोपी सुधन्वा गोंधळेकर यांनी म्हटलंय. सुधन्वाच्या अटकेनंतर त्याच्या कुटुंबीयांना धक्का बसलाय. या सगळ्या प्रकरणाशी अनभिज्ञ असल्याचे त्याचे वडील सुधीर गोंधळेकर यांनी म्हटलंय. सुधन्वा गोंधळेकर हा मूळचा साता-यातील असून तो सातारा शहरातील करंजे परिसरात राहतो. त्याचा पुण्यात ग्राफिक डिझाईनचा पुण्यात व्यवसाय असून त्याचे लग्न झालेले आहे. त्याला दोन लहान मुली असून त्याचा लहान भाऊ पुण्यात आयटी क्षेत्रात शिक्षण घेतोय.