मुंबई : केंद्र सरकारनं कांद्यावर निर्यात बंदीचा निर्णय घेतला. ही निर्यातबंदी तातडीने लागू करण्याचं परिपत्रकही काढण्यात आलं. मागील काही दिवसांमध्ये सातत्यानं वाढणारे कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राने तातडीने ही निर्यात बंदी लागू केल्याचं म्हटलं गेलं. पण, या निर्णयामुळं शेतकऱी वर्गामध्ये मात्र तीव्र संतापाची लाट आहे. विविध राजकीय पक्ष, शेतकरी संघटना, नेते यांनी एकत्र येत कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाचा स्पष्टपणे विरोध केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयानं सरकारला दिलेला कांदा निर्यातबंदीचा प्रस्ताव हा कोरोनाच्या संकटकाळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी धक्कादायक आहे. बाजारातील कांद्याच्या वाढत्या किमतींच्या आधारावर केंद्र सरकारनं केलेली निर्यात बंदी ही शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी आहे. यासंदर्भात भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनीही केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांना पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली. 


कांदा उत्पादक शेतकरी हा गरीब असल्याचा मुद्दा प्रकर्षानं मांडत कोरोनाच्या काळात याच शेतकऱ्यांनी देशाला सावण्याचं काम केलं आहे. कुठंही अन्नधान्याची कमतरता भासू दिली नाही असं म्हणत जगभरात कांद्याला मोठी मागणी असतानाच निर्यात बंदीचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टीनं मोठ्या नुकसानाचा आहे; असं उदयनराजे भोसले यांनी आपल्या पत्रात केंद्राला उद्देशून म्हटलं आहे. 


केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने सरकारला दिलेला कांदा निर्यातबंदीचा प्रस्ताव हा कोरोनाच्या संकटकाळात कांदा उत्पादक...

Posted by Chhatrapati Udayanraje Bhonsle on Tuesday, September 15, 2020

 


आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या नाशिकच्या कांदा बाजारपेठेचा उल्लेख करत केंद्र सरकारनं सहानुभूतीपूर्वक निर्णय़ घेत निर्यात बंदी मागे घ्यावी अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे,