हेमंत चापुडे, पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघात अटीतटीची लढत बघायला मिळणार आहे. विद्यमान खासदार अढळराव पाटील यांचा विजयाचा मार्ग यावेळी खडतर असणार आहे. याला विविध कारणं आहेत. स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या डॉक्टर अमोल कोल्हेंच्या रूपानं राष्ट्रवादी काँग्रेसला अखेर शिरूर लोकसभा मतदारसंघात चांगला उमेदवार सापडला. सलग दोन निवडणुकांपासून सुरू असलेली पराभवाची मालिका खंडीत करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. शिवाजीराव अढळराव पाटील यांना धूळ चारण्यासाठी कोल्हेंची काय रणनीती असेल, यावर सगळं अवलंबून आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अढळराव पाटील यांना प्रस्थापितविरोधी मतदानाचाही फटका बसू शकतो. शेतकऱ्यांमध्ये सध्याच्या युती सरकारबाबत असलेली नाराजी मतदानयंत्रातून प्रकट होऊ शकते. तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आता युती झाली असली तरी गेल्या साडेचार वर्षांत ताणल्या गेलेल्या संबंधांमुळे भाजप कार्यकर्ते अढळरावांना किती मदत करतील, याविषयी शंका आहे. डॉक्टर कोल्हे याचा कसा फायदा उचलतात हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.


निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केल्यानंतर देशभरात आचार संहिता लागू झाली आहे. महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक चार टप्प्यांमध्ये होणार आहे. पुण्यात पहिल्यांदा 2 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, पुणे आणि बारामतीमध्ये 23 एप्रिलला मतदान होणार आहे. मावळ आणि शिरूरमध्ये 29 एप्रिलला मतदान होणार आहे. राजकीय विश्लेषकांचा माहितीनुसार, पुण्यात 2 टप्पात मतदान होणार असल्याने निवडणुकीच्या आधी प्रचाराला वेळ मिळणार आहे. यामुळे काही समीकरणं बदलू शकतात. मागच्या वर्षी मोदी लाटेत पुण्यात शिवसेना आणि भाजप युतीचे उमेदवार विजयी झाले होते.


पुणे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. पण मागच्या निवडणुकीत येथे राष्ट्रवादीला फटका बसला होता. पुण्यातून भाजपचे अनिल शिरोळे खासदार झाले. त्यांनी काँग्रेसच्या विश्वजीत पतंगराव कदम यांचा पराभव केला होता. बारामतीची जागा राष्ट्रवादीकडे आहे. येथून सुप्रिया सुळे या खासदार आहेत. मागच्या निवडणुकीत भाजपने राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना येथे पाठिंबा दिला होता. त्यांना राष्ट्रवादीला येथे मोठी टक्कर दिली होती. 


मावळ मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीरंग चंदू बर्ने खासदार आहेत. राष्ट्रवादीचे राहुल नार्वेकर हे 2014 मध्ये तिसऱ्या स्थानावर होते. शिरूर मतदारसंघातू शिवसेनेचे शिवाजी राव पाटील विजयी झाले होते. राष्ट्रवादीचे देवदत्त निकम दुसऱ्या स्थानावर होते.