पुणे : शहरातील कॅम्प परिसरातल्या शिवाजी मार्केटमध्ये मोठी आग लागली. (fire in Pune) या आगीत 25 दुकाने जळून खाक झाली आहेत. दरम्यान, या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीचे कारण अजून अस्पष्ट आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटमध्ये आज सकाळी ही आग लागली. आगीने रौद्ररुप धारण केल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्याआधीच 25 दुकाने जळून खाक झालीत. अग्निशामक दलाच्या 8 गाड्यांच्या साह्याने आग विझवण्यात आली आहे.


शिवाजी मार्केट येथे मासळी बाजार आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुकाने आहेत. यातील भीषण आगीत अंदाजे 25 दुकाने जळाली असल्याचे सांगण्यात येत आहे. पुणे अग्निशमन दलाच्या 8 गाड्या आणि जवानांनी ही आग 30 मिनिटात आटोक्यात आणली.