योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : नाशिकमधून अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे.  करन्सी नोट प्रेस मधून पाच लाखांच्या नोटा गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. करन्सी प्रेस मध्ये गोपनीय रित्या चौकशी सुरू आहे. ( Big News: Five lakh notes disappear from currency note press in Nashik ) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन आठवड्यापूर्वी ही घटना उघड झाली होती. याबाबत अद्याप उपनगर पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा नोंद झालेला नाही. गुन्हा नोंद करण्यासाठी मुद्रणालयातील अधिकाऱ्यांची मध्यरात्रीपर्यंत धावपळ सुरू होती. तेलगी घोटाळा नंतर पुन्हा एका घोटाळ्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.