मुंबई : आता जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्या पुन्हा ऑनलाईन केल्या जाणार आहेत. कोव्हीड काळात शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन झाल्या नव्हत्या. आता येत्या काळात पुन्हा ऑनलाईन जिल्हा परिषद शिक्षक बदल्या होतील, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. 27 फेब्रुवारी 2017 रोजी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनामुळे शिक्षकांचा बदल्या रखडल्या होत्या. शिक्षकांच्या आंतरजिल्हा आणि जिल्हाअंतर्गत बदल्यांची (Teachers Transfers) प्रक्रिया पुन्हा मार्चपासून राबविण्यात येणार असल्याचं याआधी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांनी शिक्षक सहकार संघटनेच्या (Teachers Co-operative Society) शिष्टमंडळाला सांगितलं होतं. सॉफ्टवेअर टेंडरचे काम अजून पूर्ण झालेले नाही. टेंडरिंगचे काम लवकरात लवकर पूर्ण करुन मार्चमध्ये बदल्यांची प्रक्रिया सुरू होऊन मे महिन्यामध्ये ऑनलाइन पद्धतीने बदल्या होतील, अशी माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली होती. त्यामुळे आता बदल्या कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.


राज्यातील जिल्हा परिषदमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा आणि जिल्हा अंतर्गत बदलीच नवीन धोरण राज्य सरकारने मागच्या वर्षी ठरवण्यात आलं होत. त्या अनुषंगाने एक नवीन अद्ययावत सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी एका कंपनीची नेमणूक करण्यात अली होती.आणि त्या बरोबर एक समितीची नेमणूक देखील करण्यात आली होती. या वर्षी त्या सॉफ्टवेअर अपडेटचे काम सुरू असून त्याच्यामध्ये शिक्षकांची माहिती येणार आहे आणि ती पारदर्शक असून या सॉफ्टवेअरच्या आधारे यापुढे राज्यातील शिक्षकांची बदली ही ऑनलाईनच्या माध्यमातून होणार आहे. अशी माहिती या समितीचे अध्यक्ष आणि पुणे जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.


जिल्हा परिषद येथे शिक्षकांच्यासाठी सॉफ्टवेअर अपडेट आणि यात काय माहिती असावी कसा याचा वापर व्हावा यासाठी समितीच्या माध्यमातून बैठक आयोजित करण्यात आली होती.


या सॉफ्टवेअरमध्ये काय काय गोष्टी सुधारणा करायच्या याबद्दलचा पूर्ण नियोजन तसेच त्याचे काम सुरू आहे आणि शिक्षकांची डेटा अपडेट घेण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल आणि संपूर्ण नियोजन करण्यात येत आहे. राज्यामध्ये जवळपास साडेतीन लाख शिक्षक आहेत या साडेतीन लाख शिक्षक आहे. यामध्ये ज्यांचं डाटा जुना झाला किंवा काही गोष्टी जुन्या आहे. मोबाईल नंबर आधार कार्ड अशा काही गोष्टी अपडेट करून त्यात सुधारणा होणार आहे. हे संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी ला सांगून त्यांच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर हे सॉफ्टवेअर आहे ते एक वापरण्याच्या दृष्टीने त्याल सगळं असलं पाहिजे आणि चांगल्या सॉफ्टवेअर बरोबर सिक्युरिटी फिचर देखील चांगल असलं पाहिजे आणि तसं काम यासमितीच्या माध्यमातून होणार आहे.


'शिक्षकांना सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कुठेही बसून 24 तासात कधीही त वापर करता येऊ शकतं सरळ आणि पारदर्शक पद्धतीने त्यांना बदलीची प्रक्रिया मध्ये समोर जाता देखील येऊ शकतो. कुठल्याही प्रकारच्या त्याच्यामध्ये हस्तक्षेप करता येणार नाही. त्या अनुषंगाने या सॉफ्टवेअर तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहे.' असं देखील यावेळी आयुष प्रसाद यांनी सांगितलं आहे.