दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: रेल्वे कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारनं खुशखबर दिल्यानंतर आता राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. नवरात्रीच्या सुरुवातीलाच आणि दिवाळी आधी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदा राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची दिवळी अधिक आनंदी होणार आहे. याचं कारण म्हणजे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सणासुदीच्या तोंडावर आनंदाची बातमी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 दसरा-दिवाळीच्या तोंडावर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार  राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होणार आहे. महागाई भत्त्यामध्ये तब्बल 11 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 17 टक्क्यांवरून 28 टक्के करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय घेण्यात आला आहे. 1 जुलै 2021 पासून हा वाढीव महागाई भत्ता मिळणार आहे. जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांचा वाढीव महागाई भत्ता देण्याबाबत लवकरच आदेश करण्यात येणार आहे.