आताची सर्वात मोठी बातमी, एकनाथ शिंदे नॉट रिचेबल
Eknath Shinde Not Reachable : आताची सर्वात मोठी बातमी. राज्यसभा आणि आता विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीची मते फुटल्याने सत्ताधारी आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे.
मुंबई : Eknath Shinde Not Reachable : आताची सर्वात मोठी बातमी. राज्यसभा आणि आता विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीची मते फुटल्याने सत्ताधारी आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची जास्त मते फुटल्याने पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलवली असून काहींना बाहेरचा रस्ता दाखविण्याची शक्यता आहे. त्यातच शिवसेना नेते एकनाथ शिंदे आमदारांच्या एका गटासह नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे.
शिवसेना परत एकदा फुटीच्या उंबरठ्यावर आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे आमदारांच्या एका गटासह नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढली आहे. मध्यरात्रीच वर्षावर शिवसेनेची बैठक पार पडली. काही आमदारांची आणि नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला एकनाथ शिंदे नव्हते.
दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीत मतं कमी झाल्याने मुख्यमंत्री ठाकरे संतापले आहेत. शिवसेना आमदारांची आज तातडीने बैठक बोलविण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्या गद्दारांना बाहेरचा रस्ता दाखवणार याची उत्सुकता आहे. एकनाथ शिंदे नॉट रिचेबल आहेत. मात्र, ते गुजरातमधील सूरतमध्ये असल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात मतभेद असल्याची माहिती 'झी 24 तास'ने सर्वात आधी बातमी दिली होती.
शिवसेना आमदारांची तातडीची बैठक आज मुंबईत होत आहे. विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेची मतं कमी झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेत सर्व आमदारांना मुंबईत तात्काळ येण्याचे आदेश जारी केलेत.
विधान परिषदेत शिवसेनेचे दोन्ही उमेदवार काठावर पास झालेत. शिवसेनेचे तब्बल 3 आमदार आणि समर्थक अपक्ष आमदारांची 9 अशी एकूण 12 मतं फुटल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे संतापलेल्या शिवसेना पक्षप्रमुखांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत वर्षा निवासस्थानी दुपारी 12 वाजता बैठकीसाठी बोलावलं आहे. आईचं दूध विकणारे कोण? ठाकरे सरकार तपासणार आहे. सत्तेतले गद्दार कोण, कोणत्या गद्दारांना बाहेरचा रस्ता दाखवला जाणार याची उत्सुकता आहे.