महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप; एकनाथ शिंदेंसह अनेक सेना आमदार भाजपच्या संपर्कात?
विधानपरिषद निकालानंतर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे पहिल्या फळीतील नेते एकनाथ शिंदे निवडणुकीनंतर नॉट रिचेबल असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे शिवसेना फुटीच्या उंभरठ्यावर उभी आहे का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चीला जात आहे.
मुंबई : विधानपरिषद निकालानंतर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे पहिल्या फळीतील नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे निवडणुकीनंतर नॉट रिचेबल असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे शिवसेना फुटीच्या उंभरठ्यावर उभी आहे का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चीला जात आहे.
सेना नेते एकनाथ शिंदे काल सायंकाळपासून नॉट रिचेबल आहेत. कालच्या विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेची 11 मते फुटली आहेत. शिंदे गुजरातच्या सूरतमधील ग्रॅंड भगवती हॉटेलमध्ये असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
'झी कलक'चे संपादक दीक्षित सोनी यांनी सांगितले की, सेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 18 पेक्षा जास्त आमदार सूरतमध्ये आहेत. अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. गुजरात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष C.R. पाटील यांच्या संपर्कात आहे. पाटील यांच्याशी चर्चेनंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले सर्व आमदार याच हॉटेलमध्ये थांबले आहेत. या हॉटेलबाहेर गुजरात पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. शिंदे आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यातील मतभेदांनंतर ते थेट भाजपच्या संपर्कात आले आहेत. एकनाथ शिंदे महाविकास आघाडीसाठी संकट उभं करू शकतात.