नागपुरात ६०० चौरस फुटांची भलीमोठी राखी
बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतिक असलेल्या रक्षाबंधन निमित्तानं, नागपुरातल्या ललिता पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांनी तब्बल ६०० चौरस फूट राखी निर्माण केली आहे.
नागपूर : बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतिक असलेल्या रक्षाबंधन निमित्तानं, नागपुरातल्या ललिता पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांनी तब्बल ६०० चौरस फूट राखी निर्माण केली आहे.
२० फूट बाय ३० फूट आकाराची ही राखी, विद्यार्थ्यांनी उपयोग नसलेल्या वस्तूंच्या आधारे तयार केली आहे. जय जवान जय किसानचा नारा आणि स्वदेशी वस्तू वापरण्याचा संदेश या राखीच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांनी दिलाय.
ही राखी तयार करण्याकरता या विद्यार्थ्यांनी शिक्षकांसह सुमारे २० दिवस मेहेनत घेतली.