दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई :  कोरोनामुळे अडचणीत असलेल्या पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पालकांना दिलासा दिलाय. राज्य सरकारने शालेय शिक्षण विभागाच्या 15 टक्के  फी कपातीच्या  आदेशाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी दिली आहे. राज्य सरकार लवकरच या संदर्भात अध्यादेश काढणार आहे. राज्यमंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर यासंदर्भातील अध्यादेश काढण्यात येणार आहे. (big relief to parents in trouble due to corona 15 persent reduction in private school fees Decision in the Cabinet meeting) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सर्वोच्च न्यायालयानेही फी कपातीबाबतचे आदेश दिले होते. ठाकरे सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे ज्या पालकांचे पाल्य खासगी शाळेत शिकतात, त्यांना मोठा दिलासा मिळाला.