Santosh Deshmukh Murder Case :  बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. फरार आरोपींना पळून जाण्यास मदत करणाऱ्या डॉक्टरला अटक करण्यात आली आहे.  संतोष देशमुख हत्येनंतर खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड फरार होता. तो पोलिसांना शरण आला. वाल्मिक कराड हा सध्या CID च्या ताब्यात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीडमधील संतोष देशमुख खून प्रकरणातील तीन आरोपींना फरार घोषित करण्यात आलं आहे.  सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तिघे वाँटेड असल्याचं पोलिसांनी जाहीर केलंय. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांकडून याबाबत प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आलंय. या आरोपींची माहिती देणा-याला योग्य बक्षीसही दिलं जाणार आहे. मात्र, आरोपींना अटक करण्यात पोलीस आणि सीआयडी यांना अपयश येत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


दरम्यान, फरार आरोपींबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. बीडमधील डॉ  वायबसे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.  सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे या फरार आरोपीना पळून जाण्यत्त मदत केल्याचा संशय डॉ  वायबसे यांच्यावर आहे.  वायबसे यांची एसआयटीकडून चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.  वायबसे आणि इतर दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


बीडमधील सरंपच संतोष देशमुख खून प्रकरणी नियुक्त SIT तील काही अधिका-यांबाबत, भाजप आमदार सुरेश धस यांनी आक्षेप घेतला आहे. वाल्मिक कराड यानं गडचिरोलीतून बदली करून बीडमध्ये आणलेला अधिकारी SIT मध्ये असल्याचं सुरेश धस म्हणाले. तसंच करुणा मुंडे यांच्याविरोधात बनाव रचणारी व्यक्तीही यात असल्याचं धस यांनी सांगितलं. तर आरोपी सुदर्शन घुले यानं खंडणीसाठी हे हत्याकांड केल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच बीडमधील परळी तालुका राज्यातील सर्वाधिक प्रदूषित असून, याबाबत आपण प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र लिहिणार असल्याचं धस म्हणाले.