उदयनराजेंचा गुन्हा मागे घ्यायच्या मागणीसाठी सांगलीत बाईक रॅली
खासदार उद्यनराजेंवरचा गुन्हा मागे घ्यावा या मागणीसाठी शिवप्रतिष्ठान संघटनेनं सांगली शहरातून बाईक रॅली काढली. उदयनराजेंना जामीन मिळाल्यानं यावेळी फटाकेही वाजवण्यात आले.
सांगली : खासदार उद्यनराजेंवरचा गुन्हा मागे घ्यावा या मागणीसाठी शिवप्रतिष्ठान संघटनेनं सांगली शहरातून बाईक रॅली काढली. उदयनराजेंना जामीन मिळाल्यानं यावेळी फटाकेही वाजवण्यात आले. या रॅलीदरम्यान घोषणाबाजीही करण्यात आली. उदयनराजेंवरचा गुन्हा मागे घ्यावा यासाठी जिल्हाधिका-यांना निवेदनही देण्यात आलं.
खासदार उदयनराजे भोसलेंना मंगळवारी सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. ५० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर हा जामीन देण्यात आलाय. मात्र उदयनराजेंना एक दिवसआड पोलीस स्टेशनला हजेरी लावण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत.
या प्रकरणाची पुढील सुनावणी २ ऑगस्टला होणार आहे. एका उद्योजकाकडून खंडणी मागितल्याप्रकरणी उदयनराजेंना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी मंगळवारी सकाळीच उदयनराजे भोसले स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाले होते.