Thane Crime News :  प्रेमात  माणूस आंधळा होतो. त्याला चुक बरोबर काहीच कळत नाही. मात्र, एक तरुण प्रेमात अट्टल चोर बनला आहे. या तरुणाने गर्लफ्रेंडवर इतका पैस खर्च केला की कर्जबाजारी झाला. शेवटी कर्ज फेडण्यासाठी तो  चोर बनला. प्रेमात चोर बनलेला या तरुणासा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. प्रेमात बुडालेल्या तरुणाची स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले आहेत. 


प्रेमात बुडाला आणा कर्जबाजारी झाला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गणेश म्हाडसे (वय 32 वर्षे) असे पोलिसांनी अटक केलेल्या या चोरट्याचे नाव आहे.  मुरबाड तालुक्यातील दुर्गम भागातील टोकावडे इथला गणेश राहतो. त्याचे एका तरुणीवर प्रेम होते. प्रेमात अखंड बुडालेल्या गणेशने प्रेयसीवर प्रचंड पैसे खर्च केले. त्यामुळे तो कर्जबाजारी झाला. आता हे कर्ज  फेडायचे कसं याचा विचार करत असतानाच त्याने बाईक चोरी करण्यास सुरुवात केली.


कर्ज फेडण्यासाठी बनला चोर 


ठाणे शहर आणि आसपासच्या भागात गणेशा बाईक चोरायचा आणि मुरबाड मधल्या ग्रामीण भागातील नागरिकांना नंबर प्लेट बदलून स्वस्तात विकायचा. यातून त्याचे कर्ज फिटले. मात्र, त्याला पैशांची चटक लागली आणि तो बाईक चोर बनला. संपूर्ण ठाणे जिल्ह्यात ठाणे, कल्याण,डोंबिवली, भिवंडी, बदलापूर आशा ठीकठिकाणी त्याने बाईक्स चोरून त्या मुरबाडच्या ग्रामीण भागांत विकल्या.  कळवा रुग्णालयातील एक बाईक चोरीचा तपास करतांना पोलिसाना सीसीटीव्ही मध्ये हा तरुण दिसून आला. त्याचा मागोवा घेत पोलिसानी थेट टोकावडे गाठलं आणि या अट्टल बाईक चोराला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून 15 चोरी केलेल्या बाईक्स जप्त करण्यात आल्या असून त्यांची तो विक्री करणारच होता. त्याचा साथीदाराला सुद्धा पोलिसानी अटक केली आहे. चार दिवस  ठाणे न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली असून अधिक तपास कळवा पोलिस करत आहेत.


कल्याणमध्ये ज्वेलर्सवर दरोडा


कल्याणमधील बिर्ला कॉलेज परिसरात अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तीन दुकानाच्या दोन भिंतींना भगदाड पाडून चोरटे ज्वेलर्सच्या दुकानात घुसले. मात्र, कटर मशीनचा गॅस अचानाक बंद झाल्याने चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला. चोरटे मुख्य लॉकर तोडू शकले नाही. मात्र दुकानाच्या शोकेस मधील दागिने घेऊन चोरटे पसार झाले. काही दिवसापूर्वी ज्वेलर्सच्या शेजारी दोन दुकाने सोडून काही तरुणांनी मोबाईल शॉप सुरु करण्यासाठी एक गाळा भाड्याने घेतला होता. या तरुणांकडून ही दुकानफोडी केली असल्याचे सांगितले जात आहे. खडकपाडा पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.