मुंबई : परभणी जिल्ह्यातील (Parbhani 800 Chicken died due to Bird Flu)  मुरुंबा गावात ८०० कोंबड्या बर्ड फ्लूने मृत पावल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. आता परभणीच्या सेलू तालुक्यातील कुपटा गावात सुद्धा २ कुकुट पालकांच्या पाचशे कोंबड्यांचा मृत्य झाल्याची माहिती समोर आली आहे. मागील पाच सहा दिवसात या कोंबड्या मेल्या आहेत. सेलू तालुक्यातील कुपटा गाव परिसरात गावरान कोंबड्यांचे शेतीला जोडधंदा म्हणून संगोपन करीत असतात. या गावातील पाचशे कोंबड्या अज्ञात रोगाने मृत पावल्याची माहिती आहे. कुपटा येथील मोहन जाधव यांच्या ४५० आणि समाधान दुधवडे यांच्या ५० कोंबड्या अज्ञात रोगाने मृत पावल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सात राज्यानंतर महाराष्ट्रातही बर्ड फ्लूचा शिरकाव झाला असं म्हणावं लागेल. परभणीत मुरुंबा गावात ८०० कोंबड्यांचा बर्ड फ्लूने मृत्यू तर सेलू तालुक्यातील कुपटा गावात ५०० कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची माहिती भोपाळच्या राष्ट्रीय प्रयोग शाळेने दिली आहे. मुरुंबा आणि कुपटा गाव बर्ड फ्लू संसर्गित म्हणून घोषित करण्यात आला आहे. (देशात या ७ राज्यात बर्ड फ्लू, अंडे-चिकन खरेदी करताना घ्या अशी काळजी) 


गावात १ किलोमीटरच्या आतल्या कोंबड्या, पाळीव पक्षी नष्ट करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहे. १० किलोमीटर अंतरापर्यंत कोंबडी खरेदी-विक्रीवर बंदी करण्यात आली आहे. तसेच गावातल्या लोकांचीही वैद्यकिय तपासणी होणार आहे. 


केरळ, राजस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात आणि उत्तरप्रदेशनंतर आता महाराष्ट्रातही बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. परभणी जिल्ह्यातील मुरुंबा आणि कुपटा गाव  बर्ड फ्लू संसर्गित म्हणून घोषित करण्यात आलं आहे.  मुरुंबा गावात ८०० कोंबड्यांचा बर्ड फ्लूने मृत्यू झाल्याचं उघड झालं आहे .



गेल्या ३ दिवसात कोंबड्याचे हे मृत्यू झालेत भोपाळच्या राष्ट्रीय प्रयोग शाळेने ही माहिती दिली आहे. तर सेलू तालुक्यातील कुपटा गावात सुद्धा २ कुकुट पालकांच्या पाचशे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची माहिती उघड झाली आहे.  पाच सहा दिवसात या कोंबड्या मेल्याची नोंद झाली आहे.