Nagpur News Today: नागपुरात बर्ड फ्लूचा संक्रमण झाल्याचे समोर आले आहे. राज्य सरकारच्या प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रामधील पोल्ट्री फार्ममध्येच बर्ड फ्लूचा उद्रेक होऊन गेल्या काही दिवसात रोज शेकडो कोंबड्यांचा मृत्यू होत होता. त्यानंतर पशु संवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एवढ्या मोठ्या संख्येने कोंबड्यांचा मृत्यू का होत आहे? हे तपासण्यासाठी पुण्याच्या आणि नंतर भोपाळ मधील उच्च सुरक्षा प्रयोगशाळेत तपासणीसाठी नमुने पाठवण्यात आले होते. त्यानंतर चार मार्च रोजी आलेल्या अहवालात कोंबड्यांना बर्ड फ्लूची म्हणजेच एवियन इन्फ्लुएंजाची लागण झाल्याचे रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले आहे. (Nagpur Bird Flu Outbreak)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बर्ल्ड फ्लूची संक्रमण झाल्याचे समोर येताच नियमानुसार संबंधित पोल्ट्री फार्मच्या एक किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र तर दहा किलोमीटर पर्यंतचा परिसर निगराणी क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. तसंच, रिपोर्ट आल्यानंतर पाच मार्चच्या रात्री संबंधित पोल्ट्री फार्म मधील 8501 कोंबड्यांची कलिंग म्हणजेच कोंबड्या मारण्याची प्रक्रिया करण्यात आली. सोबतच फॉर्म मधील 16हजार पेक्षा जास्त अंडीही नष्ट करण्यात आली आहेत.


नागपूरच्या जिल्हा परिषद संवर्धन उपायुक्त मंजुषा पुंडलिक यांनी प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रामधील पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक झाल्याचे मान्य केले आहे. तसेच नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नसून शासनाने संबंधित पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक झाल्यानंतर पाळावयाच्या सर्व नियमांचे पालन करत कोंबड्या आणि अंडी नष्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण  केल्याचा दावा केला आहे.


बर्ड फ्लू म्हणजे काय?


बर्ड फ्लू हा आजार एवियन इन्फ्लुएंजा व्हायरस H5N1 मुळं होतो. साधारणतः हा व्हायरल कोंबड्या, टर्की, मोर आणि बदक या पक्ष्यांमुळं पसरतो. हा व्हायरस फार धोकादायक असून त्यामुळं पक्ष्यांसोबत माणसांचाही मृत्यू होण्याची भिती असते. बर्ड फ्लुचे मुख्य कारण हे पक्षीच असतात. माणसांमध्ये हा आजार कोंबड्यांमुळं किंवा पक्षांच्या बर्ड फ्लू झालेल्या पक्ष्यांच्या सानिध्यात आल्यामुळं होतं. 


बर्ड फ्लूची लक्षणे काय?


बर्ड फ्लूची लक्षण ही तापासारखीच असतात. ताप, छातीत कफ होणे, नाक वाहणे, डोकेदुखी, घशात सूज, स्नायूंमध्ये वेदना, उलट्या होणं, डोळ्यांच्या समस्या, अशी लक्षणे दिसतात. 


बर्ड फ्लूपासून कसा करा बचाव


बर्ड फ्लू झालेल्या पक्षापासून लांब राहा. तसंच, परिसरात बर्ड फ्लूची साथ आली असेल तर काही दिवस चिकन खाणे टाळा. तर, मासांहर करायचा असेल तर चिकन खरेदी करताना स्वच्छ आहे का याची खात्री करुन घ्या. जिथे साथ पसरली आहे तिथे जाताना हातात ग्लोव्ह्स आणि मास्क लावूनच जा.