बर्ड फ्लू : कोंबड्या घेऊन जात असताना मुलगा हळहळला
मुलाला दुःख अनावर
किरण ताजणे, झी मीडिया, पुणे : मुळशी तालुक्यातील नांदे इथे जिल्ह्यातील पहिला बर्ड फ्ल्यू चा विषाणू सापडला असून परिसरात खळबळ उडाली आहे. मावळ आणि मुळशीतील सर्व टीमच्या सहाय्याने संध्याकाळ पर्यंत तेथील पोल्ट्रीतील सुमारे पाच हजारावरून अधिक कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे, अशी माहिती तालुका पशूसंवर्धन अधिकारी डॉ.सचिन काळे यांनी दिली.
अमित अशोक रानवडे यांच्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या पोल्ट्रीतील चार कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या होत्या. त्यानंतर रोज चार ते पाच कोंबड्यांचा मृत्यू होऊ लागला. त्यामुळे चार दिवसांपूर्वी तेथील पोल्ट्री मालकाने मृत कोंबड्यांची तपासणी पुणे येथील औंधच्या प्रयोगशाळेत करून घेतली. नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशूरोग संस्थेकडे पाठविला. त्याचा अहवाल नुकताच काल शुक्रवार उशिरा आला आणि त्यात या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यू च्या विषाणूने झाल्याचे निष्पन्न झाले.
सम्राट गराडे नावाच्या मुलाला तर आपल्या कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्यामुळे अश्रू अनावर झाले. हा मुलगा आपल्या कोंबड्यासाठी चक्क ढसाढसा रडला. लहान मुलांचं आपल्या पाळीव प्राण्यांशी एक वेगळं नातं असतं. ही मुलं त्यांना आपलं जवळचं मानतात. त्यामुळे कोंबड्यांचा मृत्यू झाल्यामुळे मुलगा ढसाढसा रडू लागला.
अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील कुक्कुटपालन केंद्रातील कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्ल्यू’ मुळेच झाल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालातून निष्पन्न झाल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी एक किमी परिघातील सर्व कुक्कुट पक्षांचे कलींग करून नष्ट करावेत असे आदेश दिले होते. त्यानुसार पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने शनिवारी दिवसभरात १ हजार ५०० कुक्कुट पक्षांचे वैज्ञानिक पद्धतीने कलींग करून त्यांना नष्ट केले.
तसे प्रशासनाकडून सर्व पाळीव पक्षांची क्लीन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत जर पक्ष्यांची क्लिनिंग करण्यास कुणी टाळाटाळ केली तर त्याच्यावर कार्यवाही करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं तर कुणाचे पक्षी राहिले असतील तर त्यांनीही प्रशासनाकडे शासनाकडून आपले पक्षी क्लीन करून घ्यावेत असे आवाहन करण्यात आला आहे तर क्लीन करण्यात येणाऱ्या पक्षांचा मोबदला हा संबंधित मालकांना दिला जाईल असे सांगण्यात आले.