नांदेड : व्हर्च्युअल करन्सी, क्रिप्टोकरन्सी म्हणजेच अदृश्य चलनाचं मायाजाल देशातल्या फक्त मोठ्या शहरांतच नाही तर नांदेडसारख्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात असल्याचं उघड झालंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिटकॉईन सॉफ्टवेअरमध्ये गुंतवणूक केल्यास प्रती महिना १० टक्के व्याजदर देण्याचं अमिष दाखवून, गेन बिटकॉईन कंपनीनं अनेकांना गंडा घातला. दिल्लीत कार्यालय असलेल्या गेन बिटकॉईनचा निर्माता अमित भारद्वाज हा या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार आहे.


एकट्या नांदेडमधून जवळपास १ हजाराच्यावर बिटकॉईन हे अमीत भारद्वाजच्या गेन बिटकॉईनकडे देण्यात आले आहेत. त्याचं आजचं मूल्य १०० कोटींपेक्षा अधिक आहे. गेन बिटकॉईनचा निर्माता अमीत भारद्वाज अब्जावधी रुपये कमवून सध्या दुबईमध्ये आहे. संपूर्ण भारतात त्याच्या गेन बिटकॉईनचं जाळं पसरलं आहे.