`भाजपा कार्यकर्त्यांचे व्यवहार अटलजींच्या विचारांप्रमाणे आहेत का ?`
गडकरी यांनी अटलजींच्या आठवणींना उजाळा देतानाच पक्षाच्या विद्यमान नेते आणि कार्यकर्त्यांचे कान टोचले.
नागपूर : भाजप कार्यकर्त्यांच्या चाल, चलन, चारित्र्य आणि व्यवहार खरोखर अटलजींच्या विचार आणि त्यांच्या मिशनच्या जवळ आहे का ? असा सवाल केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी विचारला आहे.
नागपुरात दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली सभेत नितीन गडकरी यांनी अटलजींच्या आठवणींना उजाळा देतानाच पक्षाच्या विद्यमान नेते आणि कार्यकर्त्यांचे कान टोचले.
मुंख्यमंत्र्यांची आदरांजली
याच श्रद्धांजली सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अटलजींमुळे भारत अण्वस्त्र संपन्न देश होऊ शकला असे मत व्यक्त केले.