पुणे : BJP activists to enter NCP : आता एक राजकारणातील मोठी बातमी. पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर (Indapur) तालुक्यात भाजपला गळती लागली आहे. भाजपचे हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil)  यांच्या बंधूंनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला. प्रशांत पाटील यांच्यानंतर आता माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले (Srimant Dhole) आणि इंदापूर पंचायत समितीच्या विद्यमान सभापती स्वाती बापूराव शेंडे याही राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. या प्रवेशाबाबत राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी भर सभेत माहिती दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हर्षवर्धन पाटील यांचे निकटवर्तीय 3 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत श्रीमंत ढोले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. इंदापूर तालुक्यातील लाखेवाडीत हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहेत.


इंदापूर तालुक्यातील श्रीमंत ढोले यांचे वर्चस्व आहे. ढोले हे हर्षवर्धन पाटील यांचे निकटवर्तीय मानले जात होते. मात्र काही कारणांमुळे त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांची साथ सोडून श्रीमंत ढोले हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. याआधी हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू प्रशांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) उपस्थितीत काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.