औरंगाबाद : वारिस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर औरंगाबादमध्ये मनसेच्यावतीनं निदर्शनं करण्यात आले. यावेळी मनसेनं वारिस पठाणा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांची अंतयात्रा काढली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वारिस पठाण यांच्या वक्तव्याविरोधात आज औरंगाबादेत भाजपनेही आंदोलन केले. यावेळी वारिस पठाण आणि एमआयएम विरोधात घोषणाबाजी करीत वारिस पठाण यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. तर पुतळा ही जाळण्यात आला. वारीस पठाण याची या देशातून हकालपट्टी करा अशी मागणी यावेळी करण्यात आली.


बीड भाजपच्या वतीने वारिस पठाणच्या प्रतिमेस जोड़े मरून आणि प्रतिमेच दहन करून निषेध व्यक्त केला आहे. पठाण यांनी केलेले वक्तव्य निंदनीय असून ते अशोभनीय आसल्याच मत बीडच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं आहे.


एमआयएमचे नेते वारिस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी देखील टीका केली आहे. 'वारिस तू कुणाची नोकरी करतोस, असा सवाल त्यांनी केला आहे.'


कर्नाटकातल्या कलबुर्गी येथे CAA विरोधी सभेमध्ये भाषण करताना त्यांचा तोल सुटला. आझादी मागून मिळत नसेल, तर हिसकावून घ्यावी लागेल, असं चिथावणीखोर वक्तव्य केलं. 


शाहीन बागेतील आंदोलनाचा हवाला देत आता महिलाच बाहेर आल्या आहेत, आम्ही आलो तर काय होईल असा सवाल करत १५ कोटीच असलो तरी १०० कोटींवर भारी असल्याचं म्हणत पठाण यांनी धार्मिक द्वेष निर्माण करण्याचाही प्रयत्न केला आहे.


शिवसेना आणि भाजपनं पठाण यांच्या या विधानावर टीका करत त्यांच्या अटकेची आणि एमआयएमवर बंदीची मागणी केली आहे.