पनवेल : पनवेलच्या पहिल्याच महापालिका निवडणुकीत भाजपनं जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपचे आतापर्यंत ४० जागांवर उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपचे मॅजिक फिगर गाठली आहे. तर शेकाप फक्त 4 जागांवर जिंकली आहे. शिवसेना फक्त एका जागेवर आघाडीवर आहे. येथे ठाकूर कुटुंबाचं वर्चस्व पुन्हा सिद्ध झालं आहे.


भाजपला मिळालेलं यश हे पनवेलमधल्या लोकांचं यश आहे. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचा हा विजय आहे अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली आहे. पनवेलमध्ये भाजपनं मुसंडी मारताच भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे.