नंदूरबार पालिका निवडणुकीत भाजपला जोरदार धक्का
येथील नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या टप्यातच अडचणीत आल्याचं दिसून येतंय. भाजपला अपेक्षित उमेदवारांचे अर्ज निवडणूक आयोगानं बाद ठरवल्यानं भाजपाला मोठा धक्का बसलाय.
नंदूरबार : येथील नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या टप्यातच अडचणीत आल्याचं दिसून येतंय. भाजपला अपेक्षित उमेदवारांचे अर्ज निवडणूक आयोगानं बाद ठरवल्यानं भाजपाला मोठा धक्का बसलाय.
भाजपची न्यायालयात धाव
उमेदवारांच्या छाननी प्रक्रियेत प्रभाग 14, 15, 16 आणि 17मध्ये भाजपच्या एबी फॉर्मवर क्रमांक दोनच्या उमेदवारीची नाव टाकण्यात आल्यानं हे अर्ज बाद ठरवलेत. याविरोधात भाजपनं जिल्हा न्यायालयात धाव घेतलीय.
काँग्रेसचा मार्ग सोपा?
आपण दाखल केलेला अर्ज वैध असल्याचा दावा करण्यात आला आहे. लवकरच न्यायालय या प्रकरणी न्याय देईल, असं भाजपकडून सांगण्यात आलंय. तर काँग्रेसला ही निवडणूक सोपी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोठात आनंद दिसत आहे.