Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Results 2024 : पोलिस ठाण्यात  गोळीबार झाल्याच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेला महाराष्ट्रातील हायव्होल्टेज मतदारसंघात धक्कादायक निकाल पहायला मिळाला आहे. कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघात भाजपाच्या उमेदवार सुलभा गायकवाड विजयी झाल्या आहेत. सुलभा गायवाड यांचे पती गणपत गायकवाड हे गणपत गायकवाड हे महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी सध्या तुरुंगात आहेत. पचती जेलमध्ये असल्याने त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाडयांनी निवडणूक लढवली. 


हे देखील वाचा... महाराष्ट्रातील सर्वात चॅलेंजिंग प्रोजेक्ट! मुंबईतून पुण्याला जाताना खंडाळा घाट लागणार नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गणपत गायकवाड गेले तीन टर्म कल्याण पूर्वेतून आमदार आहेत. गणपत गायकवाड हे महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकऱणी सध्या तुरुंगात आहेत. त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना कल्याण पूर्वेतून उमेदवारी देण्यात आली. यावरुन कल्याण पूर्वमध्ये महायुतीमध्ये बिघाडी निर्माण झाली होती. महायुती उमेदवार सुलभा गायकवाड यांच्या विरोधात महेश गायकवाड यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता. इतकचं नव्हे तर ते निवडणूक लढण्यावर ठाम राहिले होते. शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी त्यांच्यावर करावाई करत त्यांची पक्षातून हाकलपट्टी केली. तर, शिवसेना माजी नगरसेवक विशाल पावशे हे देखील  वंचित कडून कल्याण पूर्व मधून उमेदवार म्हणून उभे राहिल्याने त्यांचीही हकालपट्टी करण्यात आली. 


आ. गणपत गायकवाड यांनी शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही खोटे आरोप केल्याचा दावा शिवसैनिकांनी केलाय. त्यामुळे सुलभा गायकवडांच्या उमेदवारीला विरोध करुन शिवसेनेच्या 19 नगरसेवकांनी भाजपचं काम न करण्याचा निर्णय जाहीर केला होता. सुलभा गायकवाड या तब्बल 25 हजार मतांनी विजयी झाल्या आहेत. विजयानंतर त्यानी सोशल मिडियावर पोस्ट करुन आभार मानले आहेत.


सुलभा गायकवाड यांची पोस्ट...


विश्वगौरव, युगपुरुष, आपले कुटुंबप्रमुख, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी,मार्गदर्शक, देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शाह  भाई,राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जे पी नड्डाजी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी,मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, आपल्या सर्वांचे लाडके देवा भाऊ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, अजित पवारजी, कल्याण लोकसभा खासदार श्रीकांतजी शिंदे, महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि कल्याण पूर्वेतील माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींचे मनःपूर्वक आभार.आपण सर्वांनी आपल्या लाडक्या बहिणीला आपल्या मताच्या स्वरूपात दिलेलं प्रेम आणि माझ्यावर ठेवलेला विश्वास माझ्यासाठी अमूल्य देणगी आहे.