Loksabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकांची घोषणा कधी होणार याची देशात उत्सुकता आहे. एप्रिल- मे दरम्यान देशात लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. 2024 लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी आत्तापासून रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. भाजपनेही मुंबईतील्या सहा लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून खास रणनिती आखली जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतल्या सहा लोकसभा मतदारसंघावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने विशेष लक्ष आहे. मुंबईतल्या सहाही मतदारसंघात सर्वेक्षण होतंय. तर, पदाधिकाऱ्यांना अंतर्गत सर्वेक्षणासाठी दिल्लीवरून फोन केले जात असल्याची सुत्रांची माहिती आहे. मतदारसंघातील काही पर्यायांबाबत पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली जात असल्याचे समोर येत आहे. 


गोपाळ शेट्टी आणि पूजन महाजन यांच्या मतदार संघात दुसरा उमेदवार दिल्यास काय चित्र असेल याचाही आढावा केंद्रातून घेतला जातोय. तसंच, काही केंद्रीय मंत्र्यांना मुंबईतून लोकसभेच्या मैदानात उतरवायचे का? याचा अंदाज घेण्यात येत आहे. पियूष गोयल यांना कोणत्या मतदारसंघातून लोकसभेसाठी उतरवायचे याचीही चाचपणी सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 


लोकसभेसाठी मुंबईकडे विशेष लक्ष्य ठेवण्यात येणार आहे. पियूष गोयल यांना मुंबई, मुंबई उत्तर किंवा मध्य मुंबई या मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरवायचे अशी चर्चा आहे. सध्या हा मतदारसंघ गोपाळ शेट्टी आणि पूनम महाजन यांचा आहे. पियूष महाजन यांना यापैकी एका मतदारसंघातून लोकसभेसाठी तिकिट देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


मुंबईतील सहाही जागांवर महायुतीचा डोळा आहे. या जागांवर उमेदवार देतानाही चाचपणी करुन सर्वेक्षण करुनच उमेदवार रिंगणात उतरवणार आहेत. मुंबईतील या सहा मतदारसंघांपैकी चार जागा भाजप लढवेल, दोन जागा शिंदे गटाला देण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकांपबरोबर मुंबई महानगरपालिकाही भाजपला ताब्यात घ्यायची आहे. त्यामुळं याची सुरुवात ही लोकसभेपासूनच करण्यात येणार आहे. त्यामुळं मुंबईत ही रणनिती आखण्यात येत आहे. 


राज ठाकरे यांचा दक्षिण मुंबई मतदारसंघावर डोळा


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची बैठक आज पार पडली. दक्षिण मुंबई मतदार संघातील ६ विधानसभेच्या विभागवार बैठका घेण्यात आल्या आहेत. शिवडी, मुंबादेवी, मलबार हिल, कुलाबा, वरळी आणि भायखळा या विभागाची बैठक घेण्यात आली.